संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि तुकारामांची (Sant Tukaram) पालखी आता पंढरपुरकडे निघाल्या आहेत. टाळ मृदुंगाच्या जयघोषात वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. आज या दोन्ही पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत. दरम्यान भाविकांना पालख्यांचे दर्शन घेता यावे आणि वारकर्यांचा मार्ग सुकर व्हावा याकरिता वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल changebhai.in/palkhi2019/ अॅपद्वारा लोकांना लाईव्ह पाहता येणार आहेत. पहा माऊलींच्या पालखी 2019 चं संपूर्ण वेळापत्रक
पुण्यात पालख्यांचं आगमन झाल्यानंतर वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहनचालकांना पर्यायी रस्स्तांची माहिती देण्यासाठी खास वेबपेज सुरू करण्यात आलं आहे. यावर पर्यायी रस्ते, पालखीचा मार्ग, विसाव्याचं ठिकाण, वाहतुकीला लागणारा अपेक्षित वेळ याची माहिती दिली जाणार आहे. पुण्यात संभाजी भिंडेंना वारीसमोर चालण्यास पुणे पोलिसांनी मज्जाव केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सविस्तर वेळापत्रक; गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल?
12 जुलैला यंदा आषाढी एकादशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशा परदेशातून वारकरी पंढरीच्या दिशेने कूच करत आहेत