भारतामध्ये आज 5 राज्यांमधील विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती येत असतानाच महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूकीच्या निकालाकडेही महाराष्ट्राचे लक्ष होते. समाधान आवताडे विरूद्ध भगिरथ भालके यांच्यामध्ये ही निवडणूक अगदीच अटीतटीची राखिली पण 38 फेर्यांच्या निकालानंतर याचा संपूर्ण निकाल स्पष्ट होणार आहे. पण या निवडणूकीमध्ये समाधान आवताडे आणि भगिरथ भालके यांच्या मतांसोबतच अनेकांचे लक्ष होते ते म्हणजे अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांच्याकडे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 व्या फेरीअखेर अभिजीत बिचुकले यांना केवळ 66 मते मिळाली आहेत. त्यामुळे आता पुन्हा अभिजीत बिचुकले यांचे डिपॉसीट जप्त केले जाणार आहे.
अभिजीत बिचुकले हे नावं सातार्यात राजकारण्यांना नवीन नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक निवडणूकांमध्ये अभिजीत बिचुकले हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. कधी थेट खासदार उदयनराजेंना निवडणूकींच्या मैदानात आव्हान दिल्याने तर कधी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये उतरण्याची इच्छा बोलून दाखवल्याने अभिजित बिचुकले हे नाव चर्चेमध्ये राहिले होते. 2019 मध्ये विधानसभा निवडणूकीसाठी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघ निवडत आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं होतं. पण त्यावेळी देखील त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा त्यांचं आमदारकीचं स्वप्न भंगलं आहे.Pandharpur By Election Results 2021: पंढरपूरमध्ये भाजपचे 'समाधान' आवताडे यांची मोठी आघाडी; राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पराभवाच्या छायेत.
मतमोजणीच्या 30 फेऱ्यांपर्यंत समाधान आवताडे यांनी 89,037 मते मिळवत 6,910 आघाडी घेतली आहे. तर भगीरत भालके हे 82,127 मते मिळवत आवताडे यांना मागे टाकण्यासाठी प्रयत्न करत होते.
पंढरपूर मंगळवेढा मध्ये निवडणूकीचा अर्ज भरल्यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी 'विठुरायाच्या पंढरपुरामध्ये नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही आणि महाराष्ट्रातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आपण पंढरपूर पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करत असल्याचे सांगितले होते.