Medical Expenses | (Photo credit: archived, edited, representative image)

बेलापूर येथील अपोलो रुग्णालयातील (Apollo Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) चार वर्षांची अनन्या पेडणेकर जीवनमरणाचा संघर्ष करत आहे. मद्यधुंद असलेल्या एका चालकाने (Drunk Driving) बाम बीच रोडवरुन (Palm Beach Road Accident) निघालेल्या कुटुंबास त्याच्या आलीशान गाडीची धडक दिल्याने शुक्रवारी (9 नोव्हेंबर) ती गंभीर जखमी झाली आहे. ज्यामुळे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. हृदयद्रावक बाब अशी की, तिच्यावरील उपचारांचा आर्थिक खर्च इतका मोठा आहे की, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी समाजाकडे आवाहन (Financial Assistance) करावे लागले आहे. अपघातास कारण ठरलेल्या कारचालक व्यक्तीचे नाव ओमकार मोरे असल्याचे समजते. घटना घडली तेव्हा 26 वर्षीय ओमकार कथीतरित्या एसयूव्ही (SUV) चालवत होता. आपल्या पालकांसोबत निघाली असता मोरे यांनी या कुटुंबावर एसयूव्ही घातली.

अपघाात वडिलांचा मृत्यू, आईही रुग्णालयात, उपचारांचा खर्च 20 लाख रुपये

नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांनी दिलल्या माहितीनुसार, अनन्याला खांद्याला फ्रॅक्चर आणि चेहऱ्याला गंभीर दुखापतीसह अनेक जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने शस्त्रक्रियेची गरज आहे आणि रुग्णालयाचे अंदाजे बिल सुमारे 20 लाख रुपये आहे. दुर्दैवाने, अनन्याचे वडील, 40 वर्षीय मनीष पेडणेकर यांचा अपघातात मृत्यू झाला, तर तिची आई स्नेहा पेडणेकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा, Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसची ट्रकला धडक; 15 जण जखमी, 8 जणांची प्रकृती गंभीर)

पीडित कुटुंबाची सामान्य पार्श्वभूमी

विक्रोली येथे राहणारे अनन्याचे काका राजेश पेडणेकर यांनी तिच्या तात्काळ वैद्यकीय खर्चासाठी 2 लाख रुपये गोळा केले आहेत. मात्र, इतर खर्चासाठी त्यांना धावाधाव करावी लागत आहे. कुटुंब सामान्य पार्श्वभूमीचे आहे. अनन्याचे दिवंगत वडील, जे पूर्वी एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते, ते गेल्या दोन महिन्यांपासून बेरोजगार होते आणि तिची आई नवी मुंबईतील स्थानिक टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करते. (हेही वाचा - Accident On Thane-Belapur Road: दिघाजवळ ठाणे-बेलापूर रोडवर एसटी बसची दुचाकीस्वाराला धडक; 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

आरोपी चालकाच्या वडीलांकडून मदतीचे आश्वासन

इन्स्पेक्टर नायकवाडी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, त्यांनी ओंकार मोरे यांचे वडील, विजय मोरे, जे एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी आहेत, यांच्याकडे अनन्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागण्यासाठी संपर्क साधला होता. "विजय मोरे यांनी आम्हाला त्यांच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे आणि खर्चात मदत करण्यासाठी रुग्णालयाकडून बिलिंग तपशील घेतला आहे", असे नायकवाडी म्हणाले.

अपोलो रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे की, अनन्या सध्या मुख्य बालरोग तज्ञ डॉ. अभिजीत बागडे यांच्या देखरेखीखाली आहे, मात्र ते रुग्णालयाच्या धोरणानुसार अधिक वैद्यकीय तपशील उघड करू शकले नाहीत. तिच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक असलेला निधी सुरक्षित ठेवण्याच्या आशेने, अनन्याचे कुटुंब आता तिच्या उपचाराचा व्यापक खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदतीसाठी जनतेला आवाहन करत आहे.