Pali Khandoba Yatra 2020: सातारा शहरात पाली येथे रंगली खंडोबाची यात्रा; म्हाळसा देवी सोबत पार पडला देवाचा विवाह
Khandoba Mhalsa Wedding In Satara Pali (Photo Credits: Facebook)

Khandoba Mhalsa Vivah Celebration 2020:  दरवर्षी पौष महिन्यात (Paush) आयोजित केल्या जाणाऱ्या खंडोबा देवाच्या (Khandoba Yatra) यात्रेत आज सातारा (Satara) मधील पाली (Pali)  या गावी खंडोबा (Khandoba) आणि म्हाळसा (Mhalsa) देवीचा विवाह सोहळा पार पडला. पारंपरिक पद्धतीने भंडारा उधळत हा सोहळा संपन्न झाला. भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात साताराच्या पाली गावचा साज अगदी नयनरम्य दिसत होता. देवाच्या लग्नाचा थाट अगदी पाहण्यासारखा असतो, सुरुवातीला पाली गावी स्थित खंडोबा आणि म्हाळसा मंदिरातून देवांची मूर्ती आणून वाजतगाजत पालखी काढली जाते, या पालखीचा मान हा बारा बलुतेदारांना असतो. या पालखीला रथातून नगरप्रदक्षिणा घडवली जाते आणि मग पारंपरिक पद्धतीने वेद मंत्रोच्चारात भंडारा आणि खोबऱ्याच्या अक्षता यांची उधळण करत गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो.

दरवर्षी पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडेराया आणि म्हाळसा देवीच्या लग्नाचा सोहळा हा अगदी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडतो. यंदा सुद्धा देवाच्या लग्नसोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व अन्य अनेक राज्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.या लग्नाची वैशिष्ट्य सांगायची झाली तर, तारळी नदीच्या पलीकडे हा सोहळा अपार पडती यासाठी कायमस्वरूपी अशा खंडोबा आणि म्हाळसाच्या दगडी मुर्त्या उभारण्यात आल्या आहेत या मूर्तींच्या शेजारी शानदार मंडप उभारून येथे हा विवाह सोहळा पार पडतो. या सोहळ्यात भाविक उंच कावड म्हणजेच सासनकाठी नाचवत आणि भांडार या उधळत आंनद साजरा करतात.

असं म्हणतात, की छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी खंडोबाचे दर्शन घेऊन मग या सोहळ्याला सुरुवात झाली होती, जी प्रथा आजवर नेटाने आणि उत्साहाने साजरी केली जाते.