पालघर येथील एका रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिलांसोबत रॅगिंग केल्याच्या प्रकारामुळे 15 वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणी पीडित महिलांना मानसिक त्रास दिल्याचे सांगण्यात येत असून आरोपी डॉक्टरांच्या विरोधात कलम 4 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पीडित महिला प्रशिक्षणार्थी तिचे शिक्षण पूर्ण करुन दोन दिवसांपूर्वीच ढवळे रुग्णायात कामासाठी रुजू झाली होती. मात्र प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठ डॉक्टरांसोबत ओळख करुन घेताना रात्रीच्या वेळेस त्यांनी तिचा छळ केला. त्यामुळे तिला मानसिक त्रास झाल्याचे आरोप पीडित महिलेने केला आहे. यावर तिने पोलिसात धाव घेत आरोपी वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार 15 जणांवर याचा आरोप लावण्यात आला आहे.
यापूर्वी सुद्धा ढवळे रुग्णालयात गैरप्रकार झाल्याने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यात पुन्हा भर पडली असून आता रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून रॅगिंगच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येण्यासंबंधित कायदा बनवला असून ही असा प्रकार घडला आहे.(स्वत:च्या लग्नात नागिन डान्स करणे नवरदेवाला पडले महागात)