पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भुकंपाचे धक्के आज पहाटे 5.22 मिनिटांनी जाणवले आहेत. हे धक्के 3.8 रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी कोणताही अनुसुचित प्रकार घडला नाही. पण परिसरातील घरांना तडे गेले आहेत. तर माडेगावात राहाणाऱ्या एका रहिवाशांच्या घराची भिंत कोसळली आहे.
तलासरी आणि डहाणू मधील मधील विविध ठिकाणी भुकंपाचे जोरदार धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर भुकंपाचे धक्के बसताच स्थानिकांनी घरातून बाहेर पडत सुरक्षितस्थळी गेले. या प्रकरणी कोणताही जीवितहानी झाली नसल्याचे गावातील तहसीलदारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर वारंवार सुरु असलेल्या भुकंपाच्या सत्रावर लवकरात लवकर उपाय करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
तर शनिवारी हाटे 5 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी होती. गेल्या दीड वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.पालघर जिल्ह्यात नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. परंतु, या भूकंपाच्या धक्क्याचे कारण शोधण्यास शासकीय यंत्रणा अपयश ठरली आहे. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असले तरी या भूकंपाने घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, तडे गेलेल्या घरांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव आणखीही पूर्ण झालेले नाहीत.
यापूर्वी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास पालघर तालुक्यामध्ये सुमारे 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. हा धक्का पाच मीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहे. महिन्याभरापूर्वी पालघरमध्ये एका दिवसात 6 भूकंपाचे धक्के बसले होते. यामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना एका चिमुकलीचा जीव गेला होता.