Palghar Crime: पालघर येथील आश्रम शाळेतील खळबळजनक घटना; दोन लाडू का घेतले म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

Palghar Crime:  पालघर (Palghar) येथील एका आश्रम शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांने दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केली. शिक्षकाने विद्यार्थ्याला काठीने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली आहे. ही घटना पालघर येथील मोखाडा तालुक्यातील कारेगावनमध्ये घडली.शिक्षकाने पोलिस ठाण्यात तक्रार करून नये या करिता शिक्षकाने पीडित मुलाच्या आई वडिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. (हेही वाचा- दिल्लीत चार हल्लेखोरांचा घरावर हल्ला, घटना कॅमेरात कैद)

मिळालेल्या माहितीनुसार, अवघे दोन लाडू का घेतले म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थी बेशुध्द होई पर्यंत शिक्षकाने मारहाण केली. त्यानंतक शाळेतील अधीक्षत आल्यानंतर बेशुद्ध असलेल्या पीडित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले. ललित अहिरे असं मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. तर शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या रुद्राक्ष दत्ता पागी असं पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली आहे.

पीडित विद्यार्थ्यांच्या आईवडिलांवर शिक्षकाने तक्रार करू नका असा दबाव टाकला आहे. ही घटना सोमवारी घडली. जेवण्याच्या वेळीस रुद्राक्षाच्या हातात दोन लाडून होते त्यावेळी शिक्षकाने त्याची विचारणा केली आणि त्याला काठीने बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मोखाडा तालुक्यात मोठी खळबळ उडाली. विद्यार्थ्यांला बेशुध्द होऊ पर्यंत मारहाण करणे, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे त्यामुळे आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.