पालघरमध्ये एका घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातून दोन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह हा वैतरणा रेल्वेच्या पश्चिमेस पुलाखाली आढळला आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील दोन दिवसांपासून घरातून गायब असलेल्या तरुणीचा दोन दिवसांपूर्वी घरच्यांनी शोध घेतला होता. मात्र ती तरुणी मिळून आली नव्हती. दरम्यान रविवारी सकाळी रेल्वेच्या वैतरना पुलाखाली मुलीचा मृतदेह आढळला. (हेही वाचा - Dog Crushed to Death in Pune Video: सोशल मीडीया इंफ्लुएंसर Prasad Nagarkar वर Lamborghini खाली कुत्र्याला चिरडल्याचा आरोप; FIR दाखल)
पूजा रत्नाकर दुबे असे मृत तरुणीचे नाव असून ती नालासोपारा येथील राहणारी आहे. दोन दिवसापासून पूजा बेपत्ता होती. आज पूजाचा मृतदेह सापडल्याने तिझ्या नातेवाईकांनी शोक केला. केळवे सागरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केळवे पोलीस या घटनेचा तपास हा करत असून पंचनामा करुन मृतदेह हा नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. सदर तरुणीने आत्महत्या केली घातपात झाला याचा तपास सध्या सुरु आहे.