Ram Kamath Dies: चित्रकार राम कामत यांचा मृतदेह राहत्या घरी बाथटब मध्ये आढळला; पोलिसांना आत्महत्येचा संशय
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबई मध्ये माटुंगा परिसरात प्रसिद्ध चित्रकार राम कामत(Ram Indranil Kamath) यांचा मृतदेह बाथ टबमध्ये आढळला आहे. 41 वर्षीय कामत यांचा मृत्यू अकस्मात निधन म्हणून नोंदवण्यात आला असून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे. त्यांच्या घरात सुसाईड नोट सापडली आहे. दरम्यन याचा अधिक तपास सुरू आहे.

कामत हे अविवाहित होते. माटुंगा परिसरात ते आई आणि बहिणीसोबत राहत होते. बुधवार, 19 ऑगस्ट दिवशी ते आंघोळीसाठी गेले होते. बराच वेळ ते बाहेर न आल्याने त्यांच्या आईने बाथरूममध्ये पाहिले तेव्हा मृतावस्थेत ते बाथटबमध्ये पडले होते.

कामत यांना सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये निधनाचं कारण अकस्मात निधन म्हणून नमूद करण्यात आले आहे. कामत यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांच्या मृत्यूस कुणास जबाबदार धरावे याचे नाव लिहण्यात आलेले नाही. सध्या पोलिस तपास सुरू आहे. कामत कुटुंबातील व्यक्तींचा जबाब नोंदवला जात आहे.