अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या 14 पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा
Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

मुबई येथे झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याने (Terrorist Attack) संपूर्ण शहराला हादरून टाकले होते. या हल्ल्यात अनेक नागरिकांनी आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यावेळी मोठे योगदान देऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यातच 26/11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाला बढती दिली जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात 14 पोलिसांच्या पथकाने मोठी हिंमत दाखवली असून त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कसाबला जिवंत पकडण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्याच पथकाला आता सन्मानित केले जाणार आहे.

मुंबईकरांसाठी 26 नोव्हेंबर 2008 काळा दिवस म्हणून पाहायला जातो. मुंबईत 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी मुंबई पोलिसांनी शौर्य दाखवून कसाबला पकडले होते, अशाच 13 पोलीस कर्मचाऱ्यांना बढती मिळणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री म्हणाले की, 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी कसाबला जिवंत पकडताना तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. हे कार्य करताना त्यांच्यासोबत त्यांची 14 जणांची टीम होती. त्याच टीमचे एक रँक वाढून बढती दिली जाणार आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानचे 10 दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत घुसले. तसेच बेछूट गोळीबार करून त्यांनी 18 पोलीस आणि सुरक्षा रक्षकांसह 166 जणांचा जीव घेतला. सोबतच, कोट्यधी रुपयांचे नुकसान झाले. दशवतवाद्यांना रोखण्याऱ्या मोहिमेत 10 पैकी 9 दहशतवाद्यांना जागीच कंठस्नान घालण्यात आले. परंतु, कसाब हाच एकमेव जिवंत पकडण्यात आला होता. यानंतर कसाबची कसून चौकशी केल्यानंतर त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: गांजाची पुडी न दिल्याने तीन दारुड्यांकडून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत

मुंबई येथे झालेल्या या हल्ला इतका भयंकर होता की, आजही कसाबचा चेहरा लोकांच्या डोळ्यासमोरून जात नाही. कसाब याने केलेल्या गोळीबारात निष्पापी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच उच्च पदावरील पोलीस अधिकाऱ्यांना दशवाद्यांच्या गोळीबारात शहिद झाले होते. दरवर्षी नियमितपणे 26 नोव्हेंबर रोजी त्यांना श्रद्धांजली वाहली जाते.