Dharma patil's son Narendra Patil warns Maharashtra Government: वडील धर्मा पाटील ( Dharma patil) यांच्या आत्महत्येला एक वर्षाचा कालवधी उलटून गेला. मात्र, अद्यापही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करा अन्याथा आपणही आत्महत्या करु, असा गंभीर इशारा नरेंद्र पाटील (Narendra Patil)यांनी सरकारला दिला आहे. दोषींवर कारवाईचे अश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यंटनमंत्री जयकुमार रावल, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी ही आपले आश्वासन पाळले नाही. दोषींवर कारवाई करण्यात तेही अपयशी ठरले. असा आरोप करत पाटील यांनी या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
नरेंद्र पाटील हे धर्मा पाटील यांचे पूत्र आहेत. धर्मा पाटील यांनी विष प्राशन करुन मंत्रालयात आत्महत्या केली होती. धर्मा पाटील हे वृद्ध शेतकरी होते. एका वीज प्रकल्पासाठी त्यांच्या जमीनीचे सरकारकडून अधिग्रहण करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही. अनेकदा सरकारदरबारी खेटे घालूनही पदरी निराशाच पडली. त्यांमुळे उद्विग्न मनाने त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. २२ जानेवारी 2018 या दिवशी पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले. त्यानंतर 28 जानेवारी 2018 या दिवशी उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. विरोधकांनीही अधिवेशनाद हा मुद्दा लाऊन धरला. अखेर सरकारने चौकशीचे आदेश दिले. तसेच, पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा, मंत्रालयात शासकीय कर्मचार्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न)
दरम्यान, ज्या कारणासाठी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. त्यात दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी. ही कारवाई झाली नाही तर, माझ्याकडेही आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. मी आत्महत्या केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis) यांची राहील असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. नरेंद्र पाटील यांनी ई-मेलच्या माध्यमातून सरकारला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.