
उस्मानाबाद (Osmanabad) येथे सायबर मधील इंटरनेटचा वापर केल्यानंतर त्यासाठी 40 रुपये बिल ग्राहकाला देण्यात आले. यावरुन ग्राहक आणि मालकामध्ये वाद टोकाला गेला. तर संतप्त झालेल्या ग्राहकाने फक्त 40 रुपयांच्या बिलावरुन मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारानंतर आरोपी फरार झाला पण नंतर स्वत:हून तो पोलिसात स्थानकात दाखल होत त्याच्या गुन्हाची कबुली दिली आहे.
दशरथ पवार असे सायबर मालकाचे नाव आहे. तर विनोद लंगळे नावाचा तरुण सायबरमध्ये काही कामासाठी आला होता. त्यावेळी विनोद याने इंटरनेटचा वापर सुद्धा केला. परंतु त्यानंतर 40 रुपये इंटरनेटचे बिल देण्यास दशरथ याने विनोदला सांगितले. पण विनोदने 40 रुपये देण्यास नकार दिल्यानंतर दशहरथ याच्यासोबत त्याचा वाद झाला. दरम्यान वाद एवढा चिघळला की विनोद याने दशरथ याला जबर मारहाण केली.(पालघर: रेल्वेस्थानकात प्रकृती बिघडलेल्या वृद्धाच्या मदतीसाठी रिक्षा फलाटावर, पण चालकावर गुन्हा दाखल)
मालकाला मारहाण करताना छातीवर जोरदार मार बसल्याने तो बेशुद्ध झाला. त्यानंतर दशरथ याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी दशरथ याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर स्वत:हून पोलिसांना गुन्हाची कबुली विनोद याने दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.