मुंबईसह(Mumbai) राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. तसेच सखल भागात पाणी साचून नागरिकांचे हाल झाले आहेत. परंतु डोबिंबलीकरांना (Dombivali) पावसाळ्यात अधिकच त्रास सहन करावा लागतो. कारण या भागात अनेक रासायनिक कंपन्या असून त्यामधून निघणाऱ्या केमिकलच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूष होते. याचा परिणाम ऐन पावसाळ्यात प्रत्येक वर्षी दिसून येतो. तर डोंबिवली मध्ये ऑरेंज पाऊस पडल्याचा दावा करण्यात येत असून नागरिक या प्रकारामुळे संतापले आहेत.
यापूर्वी डोंबिवली मध्ये हिरव्या रंगाचा पाऊस पडला होता. त्यामुले एमआयडीसीच्या दावडी गावातील गणेशमू्र्ती काळवंडल्या गेल्या होत्या. केमिकलयुक्त पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचा याचा त्रास सहन करावा लागतो. पण पावसाचे पाणी हिरव्यास लाल रंगाचे दिसून येते. तसेच घरातील भांड्यांवर काळ्या रंगाच्या पावडरचा थर जमा होतो. मात्र आता ऑरेंज रंगाचा पाऊस पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. या पावसामुळे पाण्यावर तेलाचा तवंग दिसून येत असल्याचे आढळून आले आहे. तसेच तेलमिश्रीत पाऊस पडल्याती बाब समोर आली आहे. याबाबत एबीपी माझा यांनी अधिक वृत्त दिले आहे. (महाबळेश्वर मध्ये पडला Monsoon 2019 मधील सर्वाधिक पाऊस; मौसिनराम आणि चेरापुंजी ला टाकलं मागे)
प्रदूषण नियंत्रण विभागाकडे या ऑरेंज पावसाचे नमूने घेऊन ते परिक्षणासाठी पाठण्यात आले आहेत. तर प्रदुषणामुळे या प्रकारचा पाऊस पडला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या पावसाच्या पाण्याचे परिक्षण करुन प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.