Maharashtra Rain Update: जाणून घ्या आजचे हवामान; मुंबईसह पुणे, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर विदर्भातील 'या' भागात यलो अलर्ट
Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Maharashtra Rain Update:  राज्यभरात पावसाने चांगलाच झोडपले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने हवामान खात्याने रेज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून ठिकठिकाणच्या शाळेला सुट्ट्या दिल्या आहे. आजही कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असल्याचे सांगितले आहे त्यामुळे प्रशासनाने  या भागातील शाळेला सुट्टी दिली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार  बहुतांश ठिकाणी रेड अलर्ट जाहिर करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने आज मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे,ठाण्यातही ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केली आहे, काल पासून पावसाने झोडपले आहे. स्वप्ननगरी मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचले. तर काही ठिकाणी सलख भागात पाण्याने पूर स्थिती निर्माण झाली.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. तर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून सुचना जारी केल्या आहे. मुसळधार पावसाने वाहतुक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ होत आहे. आज सकाळच्या आठ वाजे पर्यंंत पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईकरांना प्रशासनाने काळजी घेण्यास आवाहन केले आहे.