नाशिक दौरा आटोपून जळगावकडे जात असताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला अपघात
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

विरोधोपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बुधवारी नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपययोजनांचा आढावा घेतला आहे. दरम्यान, नाशिक दौरा आटोपून जळगावकडे जात असताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या वाहनाला अपघात (Car Accident) झाला आहे. यामुळे त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले असून त्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे झाला आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच प्रवीण दरेकर यांच्यासह इतरही सर्वच जण सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जळगावकडे प्रयाण केले. जळगावमध्ये उद्या त्यांचा दौरा आहे. ते जळगावमधील रुग्णालयांना भेट देऊन करोना विषाणूच्या स्थिती संदर्भात माहिती घेणार आहेत. "नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला.स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही", अशा आशयाचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कोविड19 रूग्णालयाला भेट

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

दरम्यान, देवेंद्र फडणवीस वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा केली होती. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आता आयसीएमआरने लक्षणे असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. चाचण्यांचे अहवाल 24 तासात कशा येतील, हे सुनिश्चित केले पाहिजे. लक्षणे असलेल्या रूग्णाच्या बाबतीत विलंबाने आलेला अहवाल हा प्राणघातक ठरू शकतो. याशिवाय खाजगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट सुरू आहे. याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.