Navi Mumbai Online Sex Racket: नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शहरातील एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी नवी मुंबई परिसरात ऑनलाइन सेक्स (Online Sex) रॅकेट चालवत होती. छापा टाकून केलेल्या या कारवाईत चार मुलींची सुटका करण्यात आली. तर हे रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या चारही मुलींना आरोपी महिलेने देहविक्रीसाठी आणल्याचा आरोप आहे. या टोळीमध्ये दोन दलालांसह आणखी काहींचा समावेश आहे. जे सध्या फरार आहेत. (Navi Mumbai Police)

देहविक्री संदर्भात ऑनलाईन जाहीरात

पोलिसांनी केल्या कारवाईत अटक झालेल्या महिलेचे नाव फ्लावीया अहिरवार असे आहे. ती केवळ 32 वर्षांची आहे. या टोळीत दोन दलालांपैकी एक पुरुष आणि एक महिला आहे. ज्यांची नावे अनुक्रमे रघू आणि पल्लवी असल्याची प्राथमिक माहिती आहे. इंटरनेटच्या माध्यमातून रघू नामक व्यक्तीने जाहिरात दिली होती. या जाहिरातीत एस्कॉर्ट सर्व्हिससाठी मोबाइल नंबर दिला होता. तसेच, देहविक्रीसाठी मुली पुरवल्या जातील असेही म्हटले होते. (हेही वाचा, Sex Racket Busted in Thane: बोर्डवर स्पा सेंटर, आत सेक्स रॅकेट; ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश, व्यवस्थापकाला अटक)

पोलिसांना सेक्स रॅकेटबाबत माहिती

शहरात चालत असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेट बाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचला. बनावट ग्राहक तयार करुन देहविक्रीसाठी चार मुलींची मागणी केली. यावर प्लाविया नामाक दलाल महिलेने पोलिसांनी बनवलेल्या डमी ग्राहकाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर वेगवेगळ्या 9 मुलींची छायाचित्रे पाठवली. तसेच 60 हजार रुपयांची होतील, असा दरही सांगितला.

देहविक्र, बनावट ग्राहक आणि पोलीस कारवाई

बनावट ग्राहकाने चार मुलींची निवड केली. तसे फ्लाविया हिला कळवले. तिने ग्राहकाला प्रिन्स इंटरनॅशनल लॉजिंग ऍन्ड बोर्डिंगजवळ भेटण्यास बोलावले. प्लाविया ठरल्याप्रमाणे चार मुलींना रिक्षात घेऊन पोहोचली. या वेळी ग्राहकाने 60 हजार रुपये दिले त्याच वेळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा मारून सर्वांना रंगेहात पकडले.