Mumbai Online Fraud: मुंबईत पुन्हा एकदा ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील मलबार हिल येथील 63 वर्षीय ज्येष्ठ महिलेंने ऑनलाईन पध्दतीने 1.84 लाख रुपये गमवले. महिलेला ट्रॅव्हल एजेन्सीचा संपर्क क्रमांक हवा होता, त्यावेळी ऑनलाइन एका पोर्टलवर तीला एका व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळाला, त्या व्यक्तीने महिलेकडून 10 रुपयची मागणी केली. तिला रिमोर्ट एक्सेंसिंग अॅपलिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्या व्यक्तीने ऑनलाइन पध्दतीने पीडित महिलेच्या बॅक अंकाउट मधून रक्कम काढल्याची माहिती समोर आली.
मलबार हिल पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, महिलाच्या चुलत भावाने तिच्यासाठी वाढदिवसा निमित्त गोवाल्या जाण्याचे विमान तिकीट काढले होते परंतू चुलत भावाकडून तिकिटवर महिलेचे टोपणनाव दिले हे बदलण्यासाठी त्या महिलेने ऑनलाइन पध्दतीने एजेन्सीचा कस्टमर केअर संपर्क शोधला. हेही वाचा- नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
त्या व्यक्तीने महिलेला एक लिंक पाठवली. तिला पेमेंट करण्यास सांगितले. लिंकवर ANY DESK डाउनलोड कऱण्यास सांगितले. पेमेंटसाठी महिलेने डेबिट कार्ड आणि क्रेडिड कार्डचे तपसिल प्रविष्ट करण्यास सांगितले याचा फायदा घेत त्या व्यक्तीने महिलेच्या बॅंक अकांउट मधून पैसे काढून त्या महिलेची फसवणूक केली.
आठ वेळा व्यवहार केल्या नंतर महिलेला आपल्या बॅंक खातेतून 1.84 लाख रुपयांचे गमावल्याचे समजले. पोलीसांनी यासंदर्भात त्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 संबंधित कलमांनुसार फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.