Online Fraud: मुंबईमध्ये निवृत्त IAS Officer ने एअर तिकीट्स ची रिफंड मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑनईन फसवणूकीतून गमावले  4.50 लाख रूपये
Fraud (Photo Credits: File Image)

ऑनलाईन घोटाळ्यामध्ये एका आयएएस ऑफिसरची 4.50 लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रद्द केलेल्या एअर तिकीटाचे रिफंड मिळवण्यासाठी व्यवहार करताना या आयएएस ऑफिसरची  (IAS Officer) मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सायबर घोटाळ्यामध्ये या व्यक्तीने 33 हजाराच्या एअर तिकिटाचे रिफंड मिळवताना साडेचार लाखाची मोठी किंमत चुकवली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, संबंधित आयएएस ऑफिसर हे वयाच्या सत्तरीमध्ये आहेत. महाराष्ट्रात त्याने Additional Chief Secretary (Home) साठी काम केले होते. आर्थिक फसवणूक झाल्यानंतर त्यांनी मुंबईत मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. कोलकाता साठी त्यांनी कुटुंबासाठी राऊंड ट्रीप साठी एअर तिकीट बूक केले होते. मात्र काही कारणास्तव त्यांना ते रद्द करावं लागलं. नक्की वाचा: पुण्यात Indian Currency ला UAE Dirhams मध्ये कमी दरात एक्सचेंज करण्याचं आमिष दाखवत व्यावसायिकाची 2 लाखांची लूट .

इंटरनेटवर सर्च करून त्यांनी रिफंड मिळवता यावा याकरिता काही नंबर शोधले होते. त्यांनी डिटेल्स पाहून फोन केला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्यांना क्रेडीट कार्ड डिटेल्स मागितले. त्यांनी ते देण्यास नकार दिले. त्यानंतर त्यांनी स्क्रिन शेअरिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि इथेच ते फसवणूक करणार्‍यांच्या जाळ्यात अडकले. त्यामधूनच त्यांनी साडेचार लाख गमावले.