पुण्यात Indian Currency ला UAE Dirhams मध्ये कमी दरात एक्सचेंज करण्याचं आमिष दाखवत व्यावसायिकाची 2 लाखांची लूट
Fraud (Photo Credits: IANS |Representational Image)

भारतीय रूपयाची (Indian Currency) युएईच्या दिराम (UAE Dirhams) मध्ये कमी दरात एक्सचेंज करून देण्याचं आमिष दाखवत एका व्यावसायिकाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार पुण्यामधील आहे. हा 28 वर्षीय व्यावसायिक असून दोन व्यक्तींनी त्याची एक्सचेंजच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार हा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात 16 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजता झाला आहे.

तक्रारदाराने नोंदवलेल्या तक्रारीमध्ये व्यावसायिकासोबत त्याच्या मित्राचे मिळून 2 लाख 1 हजारांचं नुकसान झालं आहे. फसवणूक झालेला व्यावसायिक हा हॉटेल मॅनेजमेंटचा पदवीधर आहे. लॉकडाऊन मध्ये त्याच्या नोकरीवर गदा आली. त्याला दुबईचे दिराम सोबत घेऊन जायचे होते. त्याच्या मित्राच्या ड्रायव्हरला फसवणूक करणार्‍यांनी 50 दिरामची नोट दिली. मित्राने जेव्हा पहिल्यांदा हे पैसे एक्सचेंज केले तेव्हा त्याच्याकडे 700 रूपये आले. त्याने नंतर 8 नोटा बदलल्या आणि त्याच्याकडे 4000 पेक्षा अधिक रूपये आले. पुणे: डेटिंग अॅपच्या माध्यमातून नाव बदलून तरुणीची फसवणूक; 10 लाखांना घातला गंडा.

फसवणूक करणारा भला माणूस आहे असा त्यांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी पैसे वाढवले पण यावेळी त्यांना धोका मिळाला. एपीआय राजेश उसगावकर या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यावसायिक आणि त्याच्या मित्राने काही 500 आणि 2000 रूपयांच्या भारतीय नोटा आणल्या तेव्हा फसवणूक करणार्‍यांनी कापडात गुंडाळलेला वॉशिंग सोप आणला. जे चलनी नोटांसारखे दिसत होते.

आर्थिक व्यवहार झाल्यानंतर दोघांनाही जमिनीवर पाडून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारानंतर दोघांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. संबंधित फसवणूक करणार्‍यांवर 406 (criminal breach of trust), 420 (cheating), 392 (theft) चे कलम लावण्यात आले आहेत.