Onion Price Hike: कांदा आणणार डोळ्यात पाणी! आजचा दर प्रति किलो 90 रुपये
कांदा (Photo Credit : ThoughtCo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच आलेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे देखील प्रचंड हाल झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने महाराष्ट्र चांगलाच जोर धरला. हा पाऊस आता कमी होणी अशी चिन्हे निर्माण झाली असताना परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपले. यामुळे शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या किंमती कडालल्या होत्याच त्यात आता कांद्याचे भावही (Onion Rates) गगनाला भिडले आहे. मुंबई बाजारभावाप्रमाणे कांद्याचा आजचा दर (Onion Price Hike) 90 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

कांद्याचे हे दर ऐकून कांदा सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार असं दिसून येतय. परतीच्या पावसामुळे कांदा उत्पादकाला चांगला फटका बसला असून नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत.

हेदेखील वाचा- Onion Price Hike: कांद्याशिवायही चविष्ट बनतात हे '5' पदार्थ मग त्याच्या चढ्या दराचं टेन्शन कशाला?

सद्य घडीला किरकोळ बाजारात कांद्याचा दर 70 ते 90 रुपये किलो आहे. तर पुण्यात कांद्याचा दर 50 ते 70 रुपये किलो आहे. 2 दिवसांपूर्वी मुंबई बाजारात कांद्याचे दर 50-70 रुपये किलो दरम्यान होते.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाचा धुमाकूळ घातला. यामुळे शेतक-यांच्या पिकांचे, फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर NCP अध्यक्ष शरद पवार आणि अन्य दिग्गज नेते दौ-यावर गेले आहेत.

दरम्यान 'नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता आणण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा' असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. या संदर्भात केंद्राकडून मदत मागण्यासाठी ते लवकरच काही खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेणार आहेत.