नाशिक (Nashik) येथील शेतकऱ्यांनी चक्क कांद्याची होळी (Onion Holi)केली आहे. ही होळी कोणत्या पारंपरीक सणामुळे नव्हे तर चक्क संतापातून केली आहे. शेतीवर वारंवार येत असलेले नैसर्गिक आरिष्ठ. त्यासोबतच व्यापाऱ्यांकडून पाडले जाणारे भाव. सरकारचे निर्यात धोरण, त्याचा कांदा दरावार होणारा परिणाम, अशा अनेक कारणांमुळे शेतकरी संतप्त आहेत. या शेतकऱ्यांच्या भावनांचा आज कडेलोट झाला. परिणामी नाशिक येथील शेतकऱ्यांनी शेतातील कांद्याची होळी (Nashik Onion Holi) केली. भरघोस उत्पादन दूरच राहिले. पण, किमान घातलेला खर्चही निघत नाही. त्याला सरकारचे धोरण कारणिभूत असल्याचे सांंगत या शेतकऱ्यांनी कांद्याची होळी (Holi) केली.
नाशिक जिल्ह्यातील येवला (Yeola) तालुक्यातील शेतऱ्यांनी आज (3 फेब्रुवारी 2021) रोजी सकाळी आकरा वाजणेच्या सुमारास कांद्याची होळी केली. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी कांद्याची अक्षरश: होळी केली. आता सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कसे पाहते याबातब सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते माहितेय? जाणून घ्या कारण)
नाशिक हा कांदाउत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील विविध जिल्हे वेगवेगळ्या पीकांसाठी ओळखले जातात. जसे की, नाशिक कांदा, द्राक्षे, सांगली हळद, द्राक्षे, वसई आणि जळगाव केळी, नागपूर संत्रे, सोलापूर ज्वारी वगैरे वगैरे. त्यामुळे कांदा पिक पाठिमागील काही दिवसापांसून आतबट्ट्याचेच ठरत आहे. नाफेडने कांदा खरेदी बंद केलीआहे. व्यापाऱ्यांनीही कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर पाडले आहते. अशा वेळी कांद्याचे करायचे तरी काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. परिणामी, सरकारने कांदा खरेदी करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, कृष्णा डोंगरे असे कांद्याची होळी केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याेन कांद्याला अग्निडाग देण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून त्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिल्याचा एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, या शेतकऱ्याने खरोखरच दीड एकर क्षेत्रावरील कांद्याची होळी केली. माझ्यासाठी आजचा दिवस अंत्यंत नकारात्मक आणि काळा आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे. शेतकरी जगला काय मेला काय त्यांना काहीच फरक पडत नसल्याची भावना या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.