Onion Market (Pic Credit - All India Radio News Twitter)

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) कांदा व्यापा-यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिका-यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापा-यांनी बेमुदत बंद (Online Market Closed) पुकारला आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी वर्गाच्या समस्यांबाबत व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील 17 कृषी उत्पन्न बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने एका दिवसात साधारणतः 30 ते 40 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. (हेही वाचा - Mumbai-Gujarat Trains Cancelled: मुसळधार पावसामुळे मुंबई-गुजरातला जाणाऱ्या 50 गाड्या रद्द; वाचा सविस्तर बातमी)

पाहा पोस्ट -

काही दिवसांपुर्वी केंद्र सरकारने कांद्याचे दर वाढत असतांना निर्यात मुल्यात 40 टक्के वाढ केली होती. या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यात अनेक संघटनांनी बंद पुकारला त्याला अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांनी साथ दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत 2420 रुपये कांदा खरेदीची घोषणा केली. बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु होत नाही तोच पुन्हा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बंद पुकारला आहे.

कांद्याचे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करावे, नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट मध्ये करुन त्याची विक्री रेशनमार्फत करावी, केंद्र व राज्य शासनाला कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारावर सरसकट पाच टक्के सबसिडी व देशातर्गत वाहतूकीवर सरसकट 50 टक्के सबसिडी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी हा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.