ONGC प्लांटचा बिघाड दुरुस्त होऊन आज सीएनजी पुरवठा पुन्हा सुरु होणार, महानगर गॅस कंपनीची माहिती
Image For Representation (Photo credit: IANS)

उरण (Uran) येथील ओनजीसीच्या (ONGC) प्लांटमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करून आज म्हणजेच 18 ऑगस्टच्या संध्याकाळ पर्यंत सीएनजी गॅसचा (CNG)  पुरवठा पुन्हा सुरळीत होणार असल्याची माहिती महानगर गॅस (Mahanagar Gas)  कंपनीतर्फे देण्यात आली आहे.मागील दोन दिवसांपासून या तांत्रिक बिघाडामुळे महानगर गॅस कंपनीला गॅसचा तुडवटा भासत होता, परिणामी टॅक्सी, बस आणि कार चालकांना मोठा फटका बसला होता. तसेच सर्व पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत होत्या. पण आता दुरुस्तीचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे समजत असल्याने ही परिस्थिती लवकरच सुधारण्याची आशा आहे.

मुंबई व उपनगरातील रिक्षा , टॅक्सी, बेस्ट बसेस धरून तब्बल सात लाख वाहनं सीएनजी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. पण उरण येथे प्लांटमध्ये बिघाड झाल्याने मुंबईतील एकूण 6 सीएनजी पुरवठा स्टेशनवर कमी झाला होता.परिणामी अनेक सीएनजी पापं बंद ठेवण्यात आले होते. तर सुरु असणाऱ्या सीएनजी गॅस पंपावर ग्राहकांना हाय डेन्सिटी गॅस मिक्स करुन गाडीत भरून दिला जात होता.(मुंबई: 2007 च्या घरगुती गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणी 'हिंदुस्थान पेट्रोलियम' ला 10 लाखांचा दंड)

दरम्यान, ओएनजीसी मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त होऊन आज संध्याकाळ पर्यंत नैसर्गिक वायुचा पुरवठा पुर्वव्रत होईल आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे गॅस पुरवठा होईल येईल असे महानगर गॅस कंपनीकडून सांगण्यात आले आहे.