मास्टरकार्ड, मुंबई मेट्रो आणि एक्सिस बँकेने मुंबई मेट्रोने प्रवास करण्याऱ्या प्रवाशांसाठी एक सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार आता मेट्रोने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यासाठी One Mumbai Metro Card लॉन्च करण्यात आले आहे. गुरुवारी या कार्ड संबंधित घोषणा करण्यात आली आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलैस ट्रॅव्हल सुनिश्चित करणे आहे. हे एक प्री-पेड, कॉन्टॅक्टलेस कार्ड असून त्याच्या माध्यमातून दररोज प्रवास करण्यासाठी फक्त टॅप करुन वापरता येणार आहे.
या नव्या सुविधेसह मास्टरकार्डने घोषणा केली आहे की, ते यापुढे सुद्धा पूर्णपणे डिजिटल माध्यमातून भारतात दररोज प्रवास करणाऱ्या लोकांचे आयुष्य बदलणार आहे. या कार्डच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या गोष्टींसह दररोजच्या सामानाची खरेदी, औषधे आणि तिकिट सुद्धा खरेदी करता येणार आहे. मास्टरकार्डकडून सांगण्यात आले की, या नव्या पावलासह ते सरकारला ट्रान्सपोर्टेशन डिजिटाइजेशनसाठी मदत करु पाहत आहेत. त्याचसोबत देशाची सुरक्षा सर्वोच्च स्तरासह डिजिटल अर्थव्यवस्था सुद्धा निर्माण करण्यासाठी योगदान देणे आहे.(Mumbai Local: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याबाबत राजेश टोपे यांचे महत्वाचे वक्तव्य)
वन मुंबई मेट्रो कार्डचे असे काही फिचर्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची कामे अगदी सहजरित्या करु शकता. या कार्डच्या माध्यमातून पूर्णपणे सुरक्षित आणि कोणत्याही समस्येशिवाय तुम्हाला त्याचा वापर करता येणार आहे. ऐवढेच नव्हे तर तिकिट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ सुद्धा वाचणार आहे. सोशल डिस्टंन्सिंगसह आणि अन्य गोष्टींसाठी याचा सहज वापर होणार आहे. हे कार्ड प्रवाशांना मुंबईतील मेट्रो स्थानकातील काउंटर्सवरुन घेता येणार आहे.
एक्सिस बँकेचे कार्ड्स अॅन्ड पेमेंटचे ईवीपी आणि हेड संजीव मोघे यांनी म्हटले की, मुंबई मेट्रो वन आणि मास्टरकार्ड एकत्रित आल्याने आम्हाला गर्व वाटत आहे. तसेच एक्सिस बँक नेहमीच अर्थव्यवस्थेला डिजिटाइज करण्यासाठी मोठी भुमिका साकारत आहे. त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, वन मुंबई मेट्रो कार्ज प्रवाशांना डिजिटल पेमेंटचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. कारण भारतात सध्या वेगाने कॅशलेस इकॉनॉमीकडे वळत आहे. तर मुंबई मेट्रो वनचे सीईओ कर्नल (माजी) शुभोदय मुखर्जी यांनी म्हटले की, मुंबईकरांसाठी वन मुंबई मेट्रो कार्डच्या लॉन्चिंगचा महत्वाचा विषय आहे. अशी अपेक्षा आहे की, या कार्डचा वापर सर्वजण करतील.