Kolhapur: कोल्हापुरात झालेल्या एका दु:खद घटनेत एका व्यक्तीचा चाकूने वार केल्याने जागीच मृत्यू झाला. दोन लोकांमधील वाद मिटवण्यासाठी ही व्यक्ती पुढे आली. मात्र, यात वाद करणाऱ्यांचा एकमेकांवरचा संयम सुटला आणि त्यांनी वाद सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या पोटात चाकूने वार केले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे शनिवारी पहाटे जितेंद्र केरवा खामकर आणि विकासनाथजी यांच्यात भांडण झाले. पानावर चुना लावण्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. यादरम्यान 47 वर्षीय अनिल रामचंद्र बारड यांना जितेंद्रने घटनास्थळी बोलावले. अनिलने दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (वाचा - Washim Crime: वाशिममध्ये धक्कादायक घटना, पती-पत्नीच्या भांडणात निर्दयी बापाने आपल्या एक वर्षाच्या मुलीला गाडले जिवंत)
दोघांमधील बाचाबाची इतकी वाढली की, विकासने मध्यस्थ अनिलवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. जास्त रक्तस्त्राव झाल्याने अनिलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विकासला अटक करून तपास सुरू केला आहे.