नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये एका व्हॉट्सअॅप युजरने प्रोफाईल फोटो म्हणून औरंगजेबाचा फोटो (Aurangzeb Photo) लावल्याने त्यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान एका हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला वाशी मधून ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर आऊटलेट मध्ये काम करत होती.
हिंदु संघटनेकडून ज्या व्यक्तीने आपला डीपी औरंगजेबचा फोटो ठेवला होता त्याचे स्क्रिन शॉर्ट पोलिस स्टेशन मध्ये सादर करत आपलि तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी कलम 298,153A अंतर्गत ती तक्रार नोंदवून घेतली. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नक्की वाचा: Kolhapur: औरंगजेबासंदर्भातील सोशल मीडिया पोस्टमुळे कोल्हापुरात दंगल; पोलिसांकडून लाठीचार्ज, Watch Video .
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांत सामाजिक तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये टिपू सुलतान, औरंगजेबाचे उदत्तीकरण केल्याचं समोर आलं आहे. यावरून कोल्हापूर देखील पेटलं होतं. अहमदनगर मध्येही एका मिरवणूकीत औरंगजेबाचे फोटो दाखवण्यात आले होते. संगमनेर मध्ये सकल हिंदू समाजच्या मिरवणूकीत दगड फेक झाली. यामध्येही काही जखमी झाले होते तर काहींच्या गाड्यांचे नुकसान झाले होते.