यंदा कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात सर्वच अनेक सण-उत्सव अगदी सध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. अशात येणाऱ्या बकरी ईद (Bakra Eid 2020) बाबतही हेच आवाहन केले गेले आहे. कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षी बकरी ईद साध्या पदध्तीने साजरी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक पार पडली, त्यामध्ये हा निर्णय घेतला गेला. याबाबत सरकारकडून काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या गेल्या आहेत.
ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा बकरी ईद 31 जुलै दिवशी सुरू होईल आणि 1 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत साजरी केली जाते. दरम्यान हा बकरी ईद चा सण ईद उल-अज़हा (Eid al-Adha) म्हणून देखील साजरा केला जातो.
बकरी ईद साधेपणाने साजरी करावी!
शासनाच्या मार्गदर्शक सूचना; pic.twitter.com/LLMYWyNs0i
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 17, 2020
सरकारतर्फे जारी केलेली मार्गदर्शक तत्वे –
- कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. (हेही वाचा: गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहावे; मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
- नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
- प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
- बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
- तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान 70 दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. या दिवशी मुसलमान लोकांच्या घरी काही चौपाया जनावरांची खास करून बकर्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप करावे लागते.