कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमायक्रोन (Omicron) संक्रमितांची संख्या महाराष्ट्रात (Omicron in Maharashtra) हळूहळू वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज (15 डिसेंबर) ओमायक्रोन संक्रमित नवे 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 2 रुग्ण उस्मानाबाद तर उर्वरीत दोन रुग्णांपैकी एक मुंबई (Mumbai) आणि दुसरा बुलढाणा (Buldana) येथे आढळून आला आहे. या नव्या रुग्णांसह राज्यात ज्ञात असलेली आतापर्यंतची ओमायक्रोन संक्रमित रुग्णसंख्या 32 इतकी झाली आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या घटत असली तरी ओमायक्रोन बाधित रुग्ण हळूहळू वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज दिवसभरात राज्यात 925 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (हेही वाचा, मुंबई सह 6 मेट्रो स्ट्रेशन मध्ये 20 डिसेंबर पासून ‘At-Risk’ राष्ट्रांमधून येणार्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट साठी प्री बुकिंग बंधनकारक)
ओमायक्रोन रुग्णसंख्या (शहरनिहाय)
- मुंबई: 13
- पिंपरी-चिंचवड: 10
- पुणे (महापालिका हद्द): 2
- उस्मानाबाद: 2
- कल्याण-डोंबिवली: 1
- नागपूर: 1
- लातूर: 1
- वसई: विरार: 1
- बुलढाणा:1
दरम्यान, ओमायक्रोन संक्रमित आढळलेल्या 25 जणांची आरटीपीसाआर (RT PCR) चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात ओमायक्रोन चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसाआर (RT PCR) चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ट्विट
COVID19 | Maharashtra reports 925 new cases & 10 deaths today; Active caseload at 6,467
4 more patients have been found to be infected with Omicron in the state, taking the tally to 32. pic.twitter.com/zbmMYMcksL
— ANI (@ANI) December 15, 2021
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या 929 जणांची प्रकृती उपचारानंतर पूर्णपणे बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून आज दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 64,94,617 जणांना वैद्यकीय उपचार घेऊन बरे वाटल्याने आणि प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोविड-19 संक्रमितांचे बरे होण्याचे (रिकवरी) प्रमाण 97.72% इतके आहे. राज्यात आज दिवसभरात कोरोना संक्रमितांच्या मृत्यूचे प्रमाण 2.12% इतके राहिले