नागपूर (Omicron In Nagpur) येथील एका 40 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे. हा व्यक्ती पश्चिम अफ्रिकेतून ( West Africa) भारतात आला आहे. या व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली असली तरी त्याच्या कुटुंबातील सदस्यांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे हा एक व्यक्ती वगळता त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटीव्ह असल्याची माहिती नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी दिली आहे.
नागपूरमधील सदर व्यक्ती नोकरी निमित्ताने पश्चिम अफ्रिकेत वास्तव्यास असतो. नुकातच तो नागरपूरमध्ये परतला. या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली तसेच त्याची जीनोम सिक्वेन्सिंग सुद्धा करण्यात आली. या चाचण्यांच्या अहवालात सदर व्यक्तीस ओमायक्रॉन संसर्ग झाल्याचे आढळून आले.सध्या त्याच्यावर उपचार रुग्णालयात सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या व्यक्तीची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांची चाचणी निघेटीव्ह आली आहे. (हेही वाचा, Omicron Variant: धारावीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क, बीएमसी राबवणार नवीन योजना)
ट्विट
Nagpur reports its first case of #Omicron in a 40-year-old man: Municipal Commissioner Radhakrishnan B
— ANI (@ANI) December 12, 2021
दरम्यान, संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. या व्यक्तीचे नमुने नागपूर विमानतळ येथून चार डिसेंबरपासून या व्यक्तीचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये ही व्यक्ती कोरना व्हायरस संक्रमीत असल्याचे निदान झाले होते. दरम्यान, त्याची जनुकीय चाचणी (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्यात आली. या व्यक्तीला ओमायक्रॉन असल्याचेही पुढे आले.