CM Eknath Shinde Stops Convoy At Oil Tanker Accident (PC - X/ANI)

CM Eknath Shinde Stops Convoy At Oil Tanker Accident: आज ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर मुलुंड आणि भांडुप दरम्यान मुंबईकडे येत असताना तेलाच्या टँकरला अपघात (Oil Tanker Accident) झाला. घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांचा ताफा मुलुंड ते भांडुप दरम्यान ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर थांबवला. तेल गळतीमुळे टँकरचा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी तिथे थांबून ठिकाण सुरक्षित असल्याची खात्री केली आणि रस्त्यावर तेल गळतीमुळे कोणीही घसरणार नाही, यासाठी अपघातस्थळी योग्य उपाययोजना केल्या.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, मुख्यमंत्री शिंदे परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि अपघातामुळे रस्त्यावर सांडलेले तेल साफ करण्यात व्यस्त असलेल्या स्वयंसेवकांच्या टीमला मार्गदर्शन करत आहेत. गजबजलेल्या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात तेल सांडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धोक्याची दखल घेताना दिसतात. सांडलेल्या तेलामुळे पुढील कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी वाहतूक वळवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे वाहतूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. (वाचा - Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांच्या नावांची संपूर्ण यादी, घ्या जाणून)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून ध्वजवंदन केले. यावेळी वर्षावरील मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारीवर्ग आणि पोलीस बांधव उपस्थित होते. त्या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.