 
                                                                 GBS in Maharashtra: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) चे रुग्ण सतत नोंदवले जात आहेत. राज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अलीकडेच 2 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील रहिवासी असलेल्या या 64 वर्षीय महिलेला जानेवारी मध्ये सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप आणि जुलाबांची समस्या त्यांना जणवत होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोन आठवड्यांच्या उफचारानंतर महिलेला अचानक अर्धांगवायू झाला. त्यानंतर तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. Kesari Patil Dies: 'केसरी टुर्स' चे संस्थापक केसरी पाटील यांचं निधन
जीबीएस म्हणजे काय?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. संसर्गानंतर हा आजार होऊ शकतो. यात रुग्णाला अचानक अशक्तपणा, हात आणि पाय सुन्न होणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायूचा अनुभव येऊ शकतो.
जीबीएसची लक्षणे
हात आणि पायांमध्ये अचानक अशक्तपणा किंवा पक्षाघात
चालण्यास त्रास होणे किंवा अचानक तोल जाणे
दीर्घकाळापर्यंत अतिसार आणि ताप
स्वतःचे रक्षण कसे करावे?
उकळलेले पाणी प्या.
ताजे आणि स्वच्छ अन्न खा.
वैयक्तिक स्वच्छता राखा.
शिजवलेले आणि कच्चे अन्न वेगळे ठेवा.
रुग्णालयात जा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या
जीबीएस हा एक गंभीर आजार आहे. परंतु वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. म्हणून, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
