देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी
Nitin Gadkari (PC -ANI)

सरकारकडे पैशांची कमतरता असून यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढाळसली आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या सरकारची तिजोरी रिकामी आहे तसेच केंद्र सरकार तिजोरी भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेत आहे तर, कधी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाबद्दल बोलत आहेत, असा आरोप विरोधी पक्ष वारंवार केंद्र सरकारवर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. 'देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही', असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. नागपूर (Nagpur) येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधीपक्षांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान ते म्हणाले की, गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत मी 17 लाख कोटी रूपयांची कामे केली आहेत. आणि या वर्षी 5 लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. पैशांची काहीही कमी नाही आणि हे सत्य आहे. जर कोणती कमतरता असेल, तर ती काम करण्याच्या मानसिकतेचीच आहे, नकारात्मक दृष्टीकोनाची आहे, असे नितीन गडकरी त्या कार्यक्रमात म्हणाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही, बेळगाव येथे प्रकट मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा कन्नडिगांना टोला

एएनआयचे ट्वीट-

नितीन गडकरी यांनी अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेना एकत्र आल्याचे म्हटले आहे. या पक्षांमध्ये वैचारिक आधार नाही. त्यामुळे राज्याला स्थिर सरकार मिळण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या विचारधारणेवर अवलंबून आहे. आता दोघांमध्ये तणावाचे संबंध असले तरीही विचारधारणेमध्ये बदल नाही. पण शिवसेना, भाजपाची युतीशिवाय राज्यात सरकार येणे हे महाराष्ट्रासह देशासाठी नुकसानीचे ठरणार आहे. कॉंग्रेस, एनसीपी आणि कॉंग्रेस पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. सरकार बनवले तरीही ते टिकणार नसल्याची भविष्यवाणी त्यांनी आधाही केली होती.