मुंबई (Mumbai) मध्ये आज ( 26 जुलै) पावसाने उसंत घेतली असल्याने बीएमसी (BMC) कडून शहरात शाळा, कॉलेज नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. X वर माहिती देताना बीएमसीने मुंबई मध्ये आज जनजीवन सुरळीत राहणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे शाळा- कॉलेज देखील सुरू ठेवले जातील. त्यामुळे पालकांनी शाळा, कॉलेज बंद असल्याच्या कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड प्रशासनाकडून मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आयएमडी कडून आज मुंबई शहरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर 27 जुलैला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील मुसळधार पाऊस होत असलेल्या ठिकाणी प्रशासनाला अलर्ट केले आहे. त्यांनी सारी मदत पोहचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई मध्ये आज शाळा- कॉलेज नियमित
मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे.
ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै २०२४ रोजी नियमितपणे सुरू राहतील.
कृपया, बृहन्मुंबई…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2024
रायगड मध्ये आज शाळांना सुट्टी
#WeatherUpdate
अतिवृष्टी सदृश्य पाऊस आणि हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर.
#RajgadRain #MaharashtraMonsoon pic.twitter.com/OGeC6VGwp6
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 26, 2024
आयएमडीच्या अंदाजपत्रात दिलेल्या माहितीनुसार, 25 ते 27 जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. रायगड साठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे तर 27 जुलै दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.