Coronavirus: कोरोना व्हायरस संसर्गाचे महाराष्ट्राशी निजामुद्दीन कनेक्शन
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे निजामुद्दीन कनेक्शन आता पुढे येऊ लागले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नवी दिल्ली येथील निजामुद्दीन दर्गा (Nizamuddin Dargah) येथे एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यांतून सुमारे 500 पेक्षाही अधिक लोक सहभागी झाले होते. तर, विदेशातीलही काही नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या 200 नागरिकांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटव्ह आली आहे. त्यातील काही लोक महाराष्ट्रातही आल्याचे पुढे आले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातही फिलिपीन्सच्या एका नागरिकाचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. हा नागरिक नवी मुंबई येथील एका दर्ग्यात थांबला होता. पुढे त्याच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली होती.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातही विदेशातून आलेल्या 10 जणांचा निवास एका मशिदीत होता. हे 10 जण दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्याला भेट देऊन आल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातही काही काही नागरिक हे निजामुद्दीन दर्ग्याला भेट देऊन आल्याचे समजते. त्यांची संख्याही मोठी असल्याचे वृत्त आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्ली येथील Hazrat, Nizamuddin Markaz दर्ग्यात सुमारे 1,746 लोक सहभागी झाले होते. यात 216 विदेशी नागरिकांचा समावेश होता. दरम्यान, 21 मार्च रोजी आणखी 824 विदेशी नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले. पुढे यातील अनेक लोक देशातील विविध ठिकाणी पोहोचले. (हेही वाचा, Coronavirus: ऐरोली परिसरात Mindspace Complex येथे कोरोना व्हायरस बाधित 1 रुग्ण; इमारत रिकामी केली)

एएनआय टविट

एएनआयने ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या 824 विदेशी नागरिकांचा तपशील 21 मार्च रोजी देशातील विविध राज्यांतील पोलीस विभागाला पाठवण्यात आला. या तपशीलामध्ये म्हटले होते की, या नागरिकांचा शोधावे आणि त्यांना वैद्यकीय विभागाकडे पाठवून त्यांचा वैद्यकीय चाचणी करण्यात यावी. आवश्यकता भासल्यास त्यांना अलगिकरण आणि विलगिकरण कक्षातही ठेवण्यात यावा, असा सल्ला देण्यात आला होता.