महाराष्ट्र: नितिन राऊत यांनी बीड, उस्मानाबाद येथील ऊस कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेवर व्यक्त केलं दु:ख
Maharashtra Minister Nitin Raut. (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रातील मंत्री नितीन राऊत यांनी आज (25 डिसेंबर) बीड मधील शेत मजूर महिलांच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान दुष्काळग्रस्त भागामध्ये रजेअभावी दिवसभराची रोजंदारी कापली जाऊ नये म्हणून शेकडो महिलांनी त्यांचं गर्भाशय काढून टाकलं आहे. दरम्यान याप्रकरणावर नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे असे सांगितले आहे. दरम्यान नितीन राऊत यांनी ANI शी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, हजारो महिला बीड, उस्मानाबाद परिसरात उसतोडीचं काम करतात. या महिलांकडे उदरनिर्वाहासाठी दिवसाच्या शेवटी मिळणार्‍या रोजंदारीचा केवळ आधार असतो. त्यामुळे ही मिळकतही जाऊ नये म्हणून गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सरकार दरबारी काही उपाय काढला जाईल त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दुष्काळग्रस्त बीड मधील धक्कादायक वास्तव! अनेकींना घ्यावा लागला 'गर्भाशय' काढून टाकण्याचा निर्णय

महिलांच्या शरीरातून गर्भाशयाचा कॅन्सर किंवा फॅब्रॉईड सारख्या गंभीर आजारांदरम्यान धोका टाळण्यासाठी गर्भाशय काढले जाते. मात्र याव्यक्तिरिक्त मुद्दामून गर्भाशय काढल्याने महिलांमध्ये हार्मोन्सचं असंतुलन, नैराश्य, वजन वाढणं यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. बीड मध्ये डॉक्टरांनी मजुरी करणाऱ्या 4605 महिलांची गर्भाशयं काढली, शिवसेना झाली आक्रमक.

ANI Tweet

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबर दिवशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान सामना या शिवसेनेच्या मुखपत्रकातील बातमीच्या अहवालानुसार, 30 डिसेंबर दिवशी दुपारी 1 वाजता होणार आहे.