भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurg Sessions Court) धक्का दिला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे. सत्र न्यायालयाने राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर (Nitesh Rane's Anticipatory Bail application Reject by Sindhudurg Sessions Court ) न्यायालयाबाहेर हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणे हे कोर्टाबाहेर निघाले होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांची गाडी मोठ्या अडवली. त्याला नितेश यांचे बंधून निलेश राणे यांनी आक्षेप घेतला. निलेश राणे आणि पोलीस यांच्यात काही काळ बाचाबचीही पाहायला मिळाली.
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्याासठी नितेश राणे यांनी प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला. हा जामीन फेटाळण्यात आला. त्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. अखेर नितेश यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले. तसेच, जामीन मागण्यासाठी खालच्या कोर्टात जा किंवा पोलिसांना शरण जा असे म्हटले होते. (हेही वाचा, Milind Narvekar: 'लघु सुक्ष्म दिलासा', नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळताच मिलींद नार्वेकर यांचे खोचक ट्विट, राजकीय वर्तुळात चर्चा)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात गेले असता सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, राणे यांच्या जामीन अर्जावर कालच (31 जानेवारी) सुनावणी झाली होती. मात्र न्यायालयाने निकाल आज (1 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत राखून ठेवला होता. आज दुपारी 3 वाजता न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.