Nitesh Rane यांच्या विरुद्ध तृतीयपंथीय समाज आक्रमक,  पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी आले एकत्र
Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

ठाकरे विरूद्ध राणे हा वाद जुना आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 'नागपूरला लागलेला कलंक' असं म्हटलं. भाजपाच्या जिव्हारी लागलेल्या या टीकेला उत्तर देण्यासाठी अनेक भाजपा नेते मैदानात उतरताना दिसले आहेत. यामध्ये नितेश राणे यांचा देखील समावेश आहे. मात्र काल उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना पुन्हा नितेश यांनी असंस्कृत भाषेचा वापर केला आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला आहे. यावरून आता वाद देखील रंगला आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीट वरून राज्यातील तृतीयपंथीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथीय समाजातील काहींनी एकत्र जमून नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. पोलिस राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचा आरोप तृतीयपंथी हक्क अधिकार संषर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील यांनी केला आहे. नक्की वाचा: CM Eknath Shinde on Uddhav Tahckeray: देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार? एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल .

पहा नितेश राणे यांचं ट्वीट

नितेश राणेंना काळं फासण्याचा इशारा

आंदोलनापूर्वी या तृतीयपंथीयांनी नितेश राणे जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल असा इशारा दिला आहे. आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी समाजाकडून रास्ता रोको करत आंदोलन सुरू आहे. रास्ता रोको करणाऱ्या तृतीयपंथीयांची पोलिसांकडून धरपकड देखील सुरू आहे.