Nitesh Rane & Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook)

ठाकरे कुटुंबावर टीकेची एकही संधी न सोडणारे राणे कुटुंबिय यांनी आता शक्ती कायद्यावरुन (Shakti Law) पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कालच महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यास शक्ती कायदा आणण्यात आला. यावरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी नामोल्लेख टाळत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना टोला लगावला आहे. तसंच 'शक्ती' कायद्याचं नाव पूर्वी 'दिशा' होतं मात्र ते का बदलण्यात आलं ते देखील ठाऊक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "महाराष्ट्र सरकारने शक्ती नावाचा नवा कायादा आणल्याने मला आनंद झाला आहे. या कायद्याचे नाव दिशा वरुन शक्ती असे बदलण्यात आले. ते काय बदललं हे ठाऊक आहे. या कायद्याअंतर्गत कारवाई करताना राज्यात कोणत्याही भेदभाव होणार नाही अशी आशा आहे. अगदी युवा कॅबिनेट मंत्री जे सध्या एक संशयित आहेत."

नितेश राणे ट्विट:

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन या दोघांच्या मृत्यू प्रकरणात भाजपने ठाकरे सरकारला विविध प्रकारे लक्ष्य केले. तसंच कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले. यामुळेच दिशा नावावरुन आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, बलात्कार, ॲसिड हल्ला आणि महिला बालिकांवरील अत्याचार अशा प्रकारच्या गुन्हांना मृत्युदंडाची तरतूद असलेला शक्ती हा कायदा आहे. या कायद्यास बुधवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी विधिमंडळात विधेयक सादर करण्यात येणार आहे.