Nitesh Rane यांचा ठाकरे सरकार वर हल्लाबोल; यंदाच्या गणेशोत्सव नियमावलीत सण साजरा करणं गणेशोत्सव मंडळासाठी कठीण
नितेश राणे (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये उद्या (8 ऑगस्ट) पासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. त्यामुळे आता सणांची धूम सुरू होणार आहे. पण कोरोनाचा धोका कायम असल्याने सरकार अजूनही त्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे नागरिकांना, दुकानदारांना, व्यापार्‍यांना पूर्ण मुभा देत नसल्याने विरोधकांकडून राज्य सरकार वर टीका होत आहे. आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( यांची भेट घेतली आहे. यावेळेस गणेशोत्सव मंडळाचे काही प्रतिनिधी देखील त्यांच्यासोबत होते. राज्यपालांच्या भेटीनंतर मीडीयाशी बोलताना राणेंनी राज्य सरकार वर हल्लाबोल केला आहे.

'महाराष्ट्रात सध्या पश्चिम बंगाल प्रमाणे स्थिती आहे. तेथे देखील दुर्गा पूजेवर निर्बंध होते. राज्य सरकारच्या सध्याच्या नियमावली नुसार यंदा गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करणं कठीण आहे. राज्य सरकार हिंदू सणांवर निर्बंध घालून त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात नितेश राणेंनी घातला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत इतर धर्मियांचे सण सुरू होते. त्यांना कोरोनाचा धाक दाखवण्यात आला नाही मग या नियमावल्या केवळ हिंदू सणांसाठी का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

ANI Tweet

दरम्यान राज्यपालांकडे आम्ही सद्य स्थिती मांडली आहे आणि त्याची दखल घेतली जाईल असे कोश्यारींनी सांगितल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात 3 ऑगस्टपासून जेथे कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे तेथे नियमावली शिथिल करण्यात आली आहे पण अद्याप प्रार्थनास्थळं बंद असल्याने, मुंबईकरांसाठी लोकल बंद असल्याने तसेच हॉटेलच्या वेळेवर निर्बंध असल्याने काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.