Dhirubhai Ambani Square च्या उद्घाटन सोहळ्यात नीता अंबानी यांनी विद्यार्थ्यांशी अस्स्खलित मराठी भाषेतून साधला संवाद (Watch Video)
Neeta Ambani Marathi Speech at Dhirubhai Ambani Square opening (Photo Credits: Instagram)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  आणि नीता अंबानी (Neeta Ambani)  यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. मात्र या धामधुमीतून थोडा वेळ काढून आज Reliance Industries च्या वतीने धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या (Dhirubhai Ambani International School) समोर खास धीरूबाई अंबानी स्क्वेअर ( Dhirubhai Ambani Square) उभारण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेस नीता अंबानी चक्क मराठीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. धीरूबाई सारखे उद्योगपती, लता मंगेशकरांसारख्या गायिका आणि सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू होण्याची इच्छा तुमच्याही मनात आहे का? असा सावाल त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारला.

नीता अंबानी यांचा मराठीतून संवाद

 

View this post on Instagram

 

#nitaambani spoke in Marathi todayat the #dhirubhaiambanisquare opening

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सुमारे 2000 वंचित मुलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. Reliance Foundation च्या विविध एनजिओचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. मुलांच्या सुरात सूर मिसळत ' वंदेमातरम' आणि 'जय हो' ही गाणी वाजली आणि त्याच्यासोबत रंगीत कारंजी उडत होती. Akash Ambani-Shloka Mehta Wedding: आकाश-श्लोका यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी सजले अंबानी हाऊस Antilia (Videos)

श्लोका आणि आकाश अंबानीच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबीयांकडून अन्नदान केले जात आहे. आठवडाभर हा अन्नदानाचा सोहळा आहे. आज मुंबईतील बीकेसी परिसरामध्ये 2000 विद्यार्थ्यांना अन्नवाटप केले जाणार आहे.