Nisarga Cyclone Live Tracker on Google Maps: 'निसर्ग चक्रीवादळ' चा मार्ग, वाऱ्याचा वेग, नेमके ठिकाण, किनारपट्टीलगत लँडफॉल गुगल मॅप्स वर कसे तपासाल?
IMD prediction on Cyclone Nisarga. (Photo Credit: Twitter)

निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone)  लॅन्डफॉल काही वेळापूर्वी सुरु झाला आहे. मुंबईच्या किनारपट्टी (Mumbai Seashore) भागापासून चक्रीवादळाचा केंद्रबिंदू अगदी जवळ आहे. अशी माहिती हवामानखात्याकडून देण्यात आली आहे. पुढील 3 तासात हे चक्रीवादळ कायम असणार आहे. अशा वेळी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad) भागात एनडीआरएफ (NDRF) सहित सर्व सुरक्षा तुकड्या सज्ज करण्यात आल्या आहेत. या वादळाचा आताचा वेग, वादळी वाऱ्यांची दिशा, नेमके ठिकाण आणि प्रवास या सर्व बाबतीत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी गूगल मॅप चा तुम्ही वापर करू शकता. गूगल मॅप्स वर निसर्ग चक्रीवादळ अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे आणि पुढे उत्तर महाराष्ट्र व त्यास लागून दक्षिण गुजरात किनारपट्टी ओलांडेल. या वादळाचा वेग 110 किमी प्रतितास असेल. महाराष्ट्रात मुबई सह किनारपट्टीलगत भागात मंगळवार पाऊस सुरु झाला आहे. आज दुपारी हा पाऊस कायम राहणार आहे.

इथे पहा वादळाचा प्रवास 

चक्रीवादळाच्या वादळाच्या अगोदर मच्छीमार वसाहती आणि मुंबईच्या सखल भागातून हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले. 35 शाळा नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारा म्हणून तयार करण्यात आल्या आहेत, महापालिकेने 300 हून अधिक संभाव्य धरणग्रस्त भागात अतिवृष्टी झाल्यास पाणी उपसण्यासाठी पंपांचीही व्यवस्था केली आहे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिक्रिया देण्यासाठी मुंबई फायर ब्रिगेडला सतर्क केले आहे.