निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indurikar Maharaj) यांच्या सासूबाई शशिकला पवार (Shashikala Shivaji Pawar) यांनी भाजपमध्ये प्रवेश (Sasikala Pawar joins BJP) केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्या विरोधात त्या अपक्ष लढल्या. पण, विजय होताच त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राजकीय पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या अपक्ष लढण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शशिकला पवार यांच्या उमेदवारीमुळे निळवंडे ग्रामपंचायत अधिक चर्चेत आली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 227 मते अधिक घेत विजय मिळवला.
नारळ पावला
शशिकला पवार यांनी निळवंडे ग्रामपंचायत (Nilwande Gram Panchayat) सरपंच पदासाठी नारळ या चिन्हावर अपक्ष निवडूक लढवली होती. निवडणूकीत मतदारांनी शशिकला यांच्या पारड्यात अधिक वजन टाकले. त्यामुळे त्या आता निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्या आहेत.
गावच्या विकासासाठी भाजप प्रवेश
गावचा विकास अधिक वेगाने व्हावा यासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सरपंच पदावरुन काम करताना आपण कोणाशी दुजाभाव करणार नाही. हा जवळचा.. तो दूरचा.. किंवा हा समर्थक.. तो विरोधक असा कोणताही भेदभाव न करता आपण सर्वांना सोबत घेऊन समान न्याय देत काम करणार, अशी प्रतिक्रिया शशिकला पवार यांनी दिली.
इंदुरीकरांचा उमेदवारीलाच विरोध
शशिकला पवार यांनी सांगितले की, इंदुरीकर महाराज यांचा माझ्या उमेदवारीलाच विरोध होता. आपण वारकारी सांप्रदयातील माणसं. आपलं क्षेत्र वेगळं.. हे क्षेत्र वेगळं.. त्यामुळे तुम्ही कितीही चांगले काम केले तरी लोक तुमच्यावर शिंतोडे उडवणारच. असे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी आपल्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र, निवडूण आल्यावर त्यांनी अभिनंदनही केल्याचे पवार यांनी म्हटले.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला आहे. निळवंडे ग्रामपंचायत बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेगर मतदारसंघात येतो. संगमनेरमधील अनेक ग्रामपंचायती थोरात गटाने जिंकल्या आहेत. असे असले तरी, निळवंडे ग्रामपंचायत मात्र, भाजपने मिळवल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, शशिकला पवार या आमच्याच गटाच्या असल्याचा दावा थोरात गटाने केला होता.