'...तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले' निलेश राणे यांच्याकडून रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका
निलेश राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra cabinet expansion) झाला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे (ShivSena) विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदार कदम (Ramdas Kadam) यांना मंत्रिपद मिळाले नाही. यावरुन रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्त समोर येत आहेत. यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया नोंदवत रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. दरम्याना, अनेक नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, रामदास कदम यांना मंत्रिमंडाळात स्थान मिळाले नसल्याने ते नाराज आहेत. तसेच रामदास कदम हे नेतेपदाचा राजीनामाही देणार आहेत, अशा चर्चा राजकीयवर्तुळात रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी रामदार कदम यांच्यावर टीका केली आहे. ट्वीटच्या माध्यमातून निलेश राणे म्हणाले की, "रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे", असे ट्विट निलेश यांनी केले आहे. हे देखील वाचा- मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटप एक-दोन दिवसांत जाहीर करु: उद्धव ठाकरे

निलेश राणे यांचे ट्वीट-

महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना पक्षाने दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत अशा विधान परिषदेवरील आमदारांना महत्त्वाची खाती दिली होती. मात्र, यावेळी शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते, रामदास कदम यांसारख्या विधान परिषदेतील ज्येष्ठ नेत्यांना व माजी मंत्र्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनाही मंत्रीपद देण्यात आले नाही.