Nilesh Rane on Sanjay Raut: 99 टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात- निलेश राणे यांची बोचरी टिका
Nilesh Rane, Sanjay Raut (Photo Credits: Facebook, PTI)

Nilesh Rane on Sanjay Raut: भाजप नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियातील ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. त्यात निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. राणे यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संजय राऊत यांना किंमत देत व नेता मानत नाही. तसेच 99 टक्के शिवसैनिक संजय राऊत यांना खटकत असल्याचे ही निलेश राणे यांनी म्हटले आहे. तर ट्वीटमध्ये निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला आहे.(Sharad Pawar on Suspension Of 8 Rajya Sabha MP: शरद पवार यांचा आज अन्नत्याग; राज्यसभा निलंबित 8 खासदारांना पाठिंबा देण्यासाठी निर्णय)

निलेश राणे यांनी ट्वीट मध्ये असे ही म्हटले आहे की, आधी CAA त्यानंतर कृषी वियषक सुधारक बिल याच्यावरुन त्यांनी लोकसभेत समर्थन केले. पण त्यानंतर राज्यसभेत विरोध याचं कारण, त्यांना किंमत देत नाहीच. पण ते खटकत सुद्धा असल्याने त्यांना फाट्यावर मारतात आणि पक्ष भुमिका बाजूला राहत असल्याची बोचरी टीका निलेश राणे यांनी ट्वीट करत केली आहे. दुसऱ्या बाजूला निलेश राणे हे उद्या नाणार प्रकल्प आणि एमआयडीसी राजापूर प्रकल्प संदर्भातील जमीन घोटाळा प्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत. तेव्हा या जमिन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करत आहे ते नावासह स्पष्ट करणार असल्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.(Nilesh Rane Criticizes On Shiv Sena: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शरद पवार यांचा गेम केला; शिवसेनेच्या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून प्रत्युत्तर)

याआधी निलेश राणे यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले असता विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. या वेळी निलेश राणे यांनी सुद्धा संधी साधत, उद्धव ठाकरेंच्या आधी एकाही मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतल्याचं आठवत नाही. यांना येऊन तीन महिनेच झाले आहेत अशात तीन दिवस सुट्टीवर जाण्याचं कारण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणता पराक्रम केला ? झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा ” अशी टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली होती.