Nilesh Rane | (Photo Credits: Facebook)

Nilesh Rane Infected with Influenza Virus: राज्यात इन्फ्लूएंझा व्हायरल वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक जण या व्हायरलचे बळी पडताना दिसत आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यालाही इन्फ्लुएंझा व्हायरलची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजप खासदार निलेश राणे यांना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. हा व्हायरस इन्फेक्शन हवेद्वारे किंवा स्पर्शाद्वारे पसरते.

भाजप खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे की, "10 तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये Influenza Virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (Lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही."