Nilesh Lanke Taking Oath: ''आय निलेश ज्ञानदेव लंके..'', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतून घेतली. 18 व्या लोकसभेचा सोहळा पार पडला तेव्हा बहुतांश खासदारांनी इंग्रजी, हिंदी आणि मग आपापल्या मातृभाषेतून शपथ घेतली. पण, चर्चा चर्चा आणि कौतुक मात्र झाले निलेश लंके (Nilesh Lanke English Speech Video) यांचे. त्याला कारण ठरले सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेले टीकात्मक वक्तव्य. लंके यांची शपथ म्हणजे सूजय विखे यांना त्यांनी दिलेलेल कृतीतून सनसणीत प्रत्युत्तर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. लंके यांचा शपथ घेतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शरद पवार यांनी टाकला डाव
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने तत्कालीन विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. महाविकासआघाडीच्या जागावाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जागा आपल्याकडे घेतली आणि त्या ठिकाणी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली. तुल्यबळ लढत असल्याने दोन्ही उमेदवार जोरदार प्रचाराला लागले होते. दरम्यान, मुद्द्यांपासून सुरु झालेला निवडणूक प्रचार अल्पावधीतच व्यक्तगत टिकाटीपण्णीवर घसलला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर व्यक्तीगत टीका केली. (हेही वाचा, Sujay Vikhe Patil: Remdesivir खेरेदी प्रकरणी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना कोर्टाने झापलं, 'अशा वेळी हेतू कधीही शुद्ध नसतो' असे म्हणत सुनावले)
काय म्हणाले सूजय विखे पाटील?
निलेश लंके यांच्यावर व्यक्तिगत टीका करत सूजय विखे पाटील यांनी त्यांची खिल्ली उडवली. दिल्लीत जाऊन लोकसभेमध्ये बोलायचे तर तुमचा खासदार शिकलेला असायला हवा. त्याला इंग्रजी निट बोलता यायला हवी. आता समोर विरोधी पक्षाने दिलेला उमेदवार संसदेत इंग्रजीमध्ये केव्हा बोलायचा? अशा आशयाची टिका विखे-पाटील यांनी केली. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: EVM मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी, निलेश लंकेंकडून व्हीडिओ ट्विट करत गंभीर आरोप)
सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून टीकेची तीव्र झोड
सुजय विखे पाटील यांनी केलेल्या टीकेवरुन सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळतून तीव्र प्रतिक्रिया आली. खरे तर संसदेमध्ये भाषण करण्यासाठी कोणत्याही प्रकारे भाषेचा अडथळा नसतो. बंधन नसते. तुम्हाला इंग्रजीसह कोणत्याही भारतीय भाषेतून बोलण्याची मुभा असते. शिवाय, इतर सदस्यांना ते ऐकता यावे यासाठी भाषांतराचीही सोय उपलब्ध असते. असा वेळी सुजय विखे यांनी केलेली टीका त्यांची उच्चभ्रू मनोवृत्ती दर्शवते, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून आली. त्याचे तीव्र पडसात अहमदनगर मतदारसंघातही उमटले. परिणामी गरीबीची आणि अल्पशिक्षीत लोकांची थट्टा करणारा खासदार आपल्याला नको, अशी जनभावना तयार झाली. परिणामी निलेश लंके मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर सुजय विखेपाटील पराभूत.
व्हिडिओ
ज्याला इंग्रजी येत नाही म्हणून प्रचारात हिणवले त्याने संसदेत इंग्रजीतच शपथ घेतली, वा रे पठ्ठया... pic.twitter.com/Xw0y156CvK
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) June 25, 2024
निलेश लंके यांनी काढला वचपा
भाषेवरुन उडवलेली खिल्ली बहुदा निलेश लंके यांच्या जिव्हारी लागली. परिणामी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथच इंग्रजीतून घेतली. लंके यांनी एक प्रकारे मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवला. तसेच, विरोधकांनी केलेली टीकाही दिशाभूल करणारी होती हे कृतीतून दाखवून दिले.