मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

पुढील विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election) विरोधीपक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) असेल असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. तर बहुजन पक्ष हा भाजपची (BJP) 'बी' टीम असल्याचे बोलण्यात आले. मात्र बहुजन पक्ष आता 'ए' टीम होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. नांदेड (Nanded) येथे महाजनादेश यात्रेवेळी फडणवीस यांनी हे वक्तव केले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा विरोधीपक्ष नेता पुढील वर्षात होणार नाही. परंतु तो बहुजनचा असेल असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. त्याचसोबत बहुजन आघाडीच्या राजकरणावरुन भाजपवर करण्यात आलेले आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत. तर फडणवीस यांनी बहुजन आघाडीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला असणार आहे.(Maharashtra Vidhan Sabha Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी 6 सप्टेंबरला : विजय वडेट्टीवार)

येत्या 1 सप्टेंबर पर्यंत बहुजन पार्टीने काँग्रेसला अल्टीमेटम देऊ केला आहे. तसेच पक्षाने राज्यामधील 288 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. परंतु या मधील फक्त 40 जागांची ऑफर काँग्रेसला देण्यात आली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे अशी इच्छा काँग्रेसने व्यक्त केली आहे.