Newborn | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) मंगळवारी रात्री शौचालयाच्या कचराकुंडीमध्ये एक नवजात बाळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही रात्री 10.30 च्या सुमाराची घटना आहे. विमानतळावरील कर्मचार्‍यांनी तातडीने हा प्रकार मुंबई पोलिसांना (Mumbai Police) कळवला आणि आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान त्या नवजात बाळाला नजिकच्या कूपर रूग्णाल्यामध्ये (Cooper Hospital) वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात आले मात्र ते मृत होते.

मुंबईत सहार पोलिसांनी पोलिसांनी सध्या अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवजात बाळाला सोडून देण्यास जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी अधिकारी विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत आणि इतर फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारित हे बाळ कुणाचे आहे ? याचा तपास सुरू आहे.

मुंबई विमानतळाच्या टी 2 वर सापडले मृत अर्भक

दरम्यान पुण्यातची दौंड भागात एका बरणीमध्ये अर्भक आणि शरिराचे अवयव कचराकुंडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दौंड मध्ये सापडलेले मृत अर्भक मुलाचे होते. तर 11 बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेषही सापडले आहेत. नक्की वाचा: Pune Shocker: दौंडमध्ये कचराकुंडीत आढळले प्लास्टिकच्या डब्यात भरून फेकून दिलेले 10 ते 12 मृत अर्भके; बेकायदेशीर गर्भपाताची शक्यता, तपास सुरु (Video).

मुंबई विमानतळावरील घटनेत सध्या  संशयितांना शोधण्यासाठी तपास अधिकारी विमान कंपन्या आणि प्रवाशांच्या नोंदींशी समन्वय साधत आहेत. तपासात मदत करणारी कोणतीही माहिती असल्यास पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी जनतेलाही केले आहे.