Mumbai Pune Expressway CCTV: पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 400  CCTV ची करडी नजर, नियम मोडल्यास होणार मोठी कारवाई
Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक वाहतुकीचे नियमांचे  उल्लंघन करत असल्यामुळे या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवण्यात येणार आहेत.  पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एकूण  400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या 1 एप्रिलपासून नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरूवात होत आहे.  (हेही वाचा - Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुरुवारी सहा तास वाहतूकीसाठी बंद, पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन)

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दर किलोमीटरला वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणात घट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भरधाव वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, रस्त्याच्या कडेला गाडी थांबवणे, वाहने ओव्हरलोड करणे या सर्वांसाठी वाहनचालकांना आता अतिरिक्त दंड द्यावा लागणार आहे.  वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दर किलोमीटरला वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे.