Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुरुवारी सहा तास वाहतूकीसाठी बंद, पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

पनवेल-कर्जत (Panvel Karjat) दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरच्या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai Pune Expressway) उद्या सहा तास वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे या कालावधीत  एक्स्प्रेसवर होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मुंबई मार्गिकेवर पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरचे (Railway Corridor) काम करण्यात येणार आहे. चिखले ब्रिज याठिकाणी उद्या 18 जानेवारीला सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम करण्यात येणार आहे. (हेही वाचा - Mumbai Pune Expressway News: शनिवार-रविवार आणि जोडून आलेला नाताळ, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतूक कोंडीने गुदमरला)

रेल्वे कॉरिडोरच्या कामामुळे मुंबई मार्गिकेवर सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहतूक बंद केलेल्या तासांमध्ये एक्स्प्रेसवेवर मुंबई मार्गिकेवर हलक्या आणि अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंधित केले जाईल. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे त्यानुसार नियोजन करावे आणि गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग वापरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

एक्स्प्रेसवेवर पुण्यापासून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई लेन किमी 55.000 बाहेर पडू शकतात आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 द्वारे मार्गाचा अवलंब करू शकतात. तसेच द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने आणि बसेस मुंबई लेन 39.800 खोपोली बाहेर पडू शकतात आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून पुढे जाऊ शकतात.